दीपनगर प्रकल्पातील अभियंत्याने केला 38 वर्षीय महिलेवर अत्याचार


A 38-year-old woman was assaulted by an engineer in Deepnagar project भुसावळ (13 सप्टेंबर 2024) : लग्न करण्याच्या आमिषाने भुसावळ तालुक्यातील 38 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला तसेच आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो व्हायरलची धमकी देत मारहाण करण्यात आली. पीडीतेच्या तक्रारीवरून दीपनगर प्रकल्पातील एका विभागातील अभियंत्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात अत्याचार व अ‍ॅट्रासिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल
भुसावळ तालुक्यातील 38 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार, संशयीत हार्दिक हेमचंद्र सोनी (दीपनगर, ता.भुसावळ) यांनी 5 डिसेंबर 2021 ते 6 जून 2024 दरम्यान लग्न करण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केला तसेच अनैसर्गिक अत्याचार केला व पीडीतेचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केली. पीडीतेने तालुका पोलिसात आरोपी हार्दिक सोनी विरोधात तक्रार दिल्यानंतर अट्रॉसिटी व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत पसार झाला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !