यावल शहरातील 22 वर्षीय युवकाची आत्महत्या


Suicide of 22-year-old youth in Yaval city यावल (13 सप्टेंबर 2024) : शहरातील किरण गरबड सपकाळे (22, श्रीराम नगर, जिल्हा परिषद मराठी शाळेमागे, यावल) या तरुणाने बुधवार, 11 रोजी मध्यरात्री यावल शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्या शेजारी असलेल्या पिंपळाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
मयताची आई सकुबाई गरबड सपकाळे (60, श्रीराम नगर, मराठी शाळेमागे, यावल) यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत किरण सपकाळेच्या मृतदेहावर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. तरुणाने आत्महत्या का केली? या मागील रहस्य काय ? याबाबत पोलिसांनी कसून तपास करण्याची अपेक्षा आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !