रक्सोल एक्स्प्रेसमध्येही चना विक्रेत्यावर हल्ला : भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा
Attack on chickpea seller in Raxol Express : Crime in Bhusawal Loh Marg Police भुसावळ (13 सप्टेंबर 2024) : भुसावळ बसस्थानकात मध्यप्रदेशच्या तरुणावर हल्ला करणार्या आरोपी जय शिंदे याने मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास डाऊन 15548 एलटीटी-रक्सोल एक्स्प्रेसमधील खाद्य पदार्थ विक्रेता अनुज शर्मा (22, खंडवा, मध्यप्रदेश) याच्यावरही पेपर कटरच्या सहाय्याने पोटावर हल्ला करीत पळ काढला.
आरोपीविरोधात भुसावळतही गुन्हा
एक्स्प्रेसने भुसावळ सोडल्यानंतरही ही घटना घडली. अनुज शर्मा या तरुणावर खंडवा येथे उपचार सुरू असून लोहमार्ग पोलिसांनी त्याचा जवाब नोंदवल्यानंतर आरोपीविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांनी सांगितले.

