भुसावळातील अल्पवयीन मुलाचे अपहरण : अज्ञाताविरोधात गुन्हा
भुसावळ (13 सप्टेंबर 2024) : घराबाहेर खेळण्यासाठी बाहेर पडलेला 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा घरी न परतल्याने बाजारपेठ पोलिसात अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जयेश चेतन वाघोदे (14, शिवपूर कन्हाळा रोड, समर्थ कॉलनी, भुसावळ) असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
संदीप शंकर वाघोदे (45, समर्थ कॉलनी, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा पुतण्या जयेश वाघोदे हा 10 रोजी रात्री नऊ वाजता खेळण्यासाठी बाहेर पडला मात्र बराच वेळ उलटूनही तो घरी न आल्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला मात्र मुलाबाबत काहीही तपास न लागल्याने त्याचे अपहरण झाल्याची खात्री झाल्यानंतर बाजारपेठ पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.

