सांगवी बुद्रुक बसस्थानकाजवळील खळ्यातून इलेक्ट्रिकल पंप लांबवला


यावल (14 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील बसस्थानकाजवळ असलेल्या शेतकर्‍याच्या खळ्यातून तब्बल एक लाख 30 हजार रुपये किंमतीचा जुना वापरते इलेक्ट्रिकल पंप अज्ञात चोरट्याने चोरी केला. हा प्रकार बुधवार, 11 सप्टेंबर रोजी निदर्शनास आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
सांगवी बुद्रुक, ता.यावल बस स्थानकाजवळ शेतकरी अतुल अशोक फिरके यांचे खळे आहे. या खळ्यामध्ये त्यांनी जुन्या वापरते एक लाख 30 हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रिकल टेक्समो कंपनीचे पंप ठेवले होते. चोरट्याने संधी साधून पंप लांबवली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अतुल फिरके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर परदेशी करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !