अमळनेर शहरातील खुनामागे समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण : नणंदेसह प्रियकराला बेड्या
‘This’ shocking reason behind the murder in Amalner city came to light: Lover’s shackles along with Nanand अमळनेर (23 सप्टेंबर 2024) : अमळनेरातील खुनाची उकल करण्यात यंत्रणेला यश आले आहे. महिला अनुकंपावर नोकरीला न लागण्यासाठी नात्याने नणंद असलेल्या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने हा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. शीतल जय घोगले (35, रा.मेहकर कॉलनी, गांधलीपुरा, अमळनेर) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
अवघ्या काही तासात गुन्ह्याची उकल
विवाहिता शीतल घोगले या पती, सासू यांच्यासह राहत होत्या. रविवारी, 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 11 वाजेच्या दरम्यान मेहतर कॉलनीसमोर बोरी नदीच्या काठावर झुडपांमध्ये शतल घोगले यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्र फिरवत मयत शितल घोगले हिची नणंद व तिचा प्रियकर यांना अटक केली.

खुनाचे धक्कादायक कारण आले समोर
मयत शीतल घोगले यांची सासूबाई पारोबाई परशुराम घोगले (55) या नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा जय हा आजारी असल्याने पारूबाई यांच्या जागी नोकरीवर त्यांची सून शीतल लागणार असल्याने त्याऐवजी मुलगी म्हणून आपणच लागले पाहिजे असा विचार शीतल घोगले यांच्या नणंदेचा तथा पारूबाई यांची मुलगी मंगलाचा होता. रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास शीतल आणि मंगलाबाई या दोघे शौचासाठी काटेरी झुडपात गेल्या होत्या. नंतर मुलगी मंगला ही परतली मात्र शीतल ही दिसून आली नाही. म्हणून शोधाशोध सुरू झाल्यानंतर काटेरी झुडपात शीतलचा मृतदेह आढळला.
संशयीतांनी दिली गुन्ह्याची कबुली
पोलिसांना तपासामध्ये मंगला हिने मी शौचाहून पाच मिनिटातच परत आली असे सांगितले होते. मात्र सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर ती तब्बल 25 मिनिटांनी परत येताना दिसली आहे. तसेच तिचा प्रियकर असल्याची माहिती मिळताच तिला विचारले, मी त्याच्याशी कधीपासून बोललेली नाही असे तिने सांगितले. मात्र सीडीआर रिपोर्ट तपासला असता ती वारंवार आणि रात्री देखील तिचा प्रियकर याचेशी बोलताना दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. संशयित आरोपी मंगला घोगलेसह तिचा प्रियकर करण मोहन घटायडे (34, रा.अयोध्या नगर, बंगाली फाईल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
मारहाण करीत केला खून
आरोपी नणंद मंगलने भावजयी शीतलचा गळा दाबून, दगडाने डोक्यावर, हातावर व गळ्यावर वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड, पीएसआय दत्तात्रय पोटे, अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचार्यांनी यशस्वीपणे गुन्ह्याची उकल केली.
