चाळीसगाव तालुक्यात तीन दिवसात दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात यश
Success in imprisoning two leopards in Chalisgaon taluk in three days चाळीसगाव (23 सप्टेंबर 2024) : चाळीसगाव तालुक्यात 19 रोजी नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात आल्यानंतर आणखी एका बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले आहे.
गणेशपूरला घेतला होता बालकाचा बळी
14 रोजी सायंकाळी गणेशपूर येथील एका बालकाचा बिबट्याने बळी घेतल्यानंतर ग्रामस्थ धास्तावले होते. वनविभागाने जनजागृती करीत ट्रॅप पिंजरे लावताच 19 रोजी एका बिबट्याला पकडण्यात आले व नंतर पुन्हा 21 रोजी बिबट्याला पकडण्यात यश आले. सुरक्षित स्थळी बिबट्याला हलवण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई उपवनसंरक्षक प्रवीण ए.यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनरक्षक अमोल पंडित, चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे व इतर सर्व वन कर्मचार्यांनी केली.
