अल्पवयीनासोबत लग्नानंतर अत्याचार करीत गर्भपात : पुण्यातील पतीसह पाच जणांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा
भुसावळ (24 सप्टेंबर 2024) : पुण्यातील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विवाह करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्यानंतर पीडीता गर्भवती राहिली व आरोपींनी पीडीतेचा गर्भपात केल्यानंतर पीडीतेने याप्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर पीडीतेच्या पतीसह आरोपी सासु-सासरे व आई-वडिलांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अत्याचारातून पीडीता गर्भवती
16 वर्षीय अल्पवयीनाचा विवाह केल्यानंतर आरोपी पतीने शारीरीक संबंध ठेवल्यानंतर पीडीता दोन महिन्यांची गर्भवती राहिली व आरोपींनी मुल आत्ताच नको म्हणत सासू-सासरे, आई-वडील व पतीने दबाव आणत पीडीतेचा गर्भपात केला. हा धक्कादायक प्रकार 30 मार्च ते 19 सप्टेंबर 2024 दरम्यान घडला. पीडित अल्पवयीन मुलीने वरणगाव पोलिसांत 23 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल दिल्यानंतर पीडीतेचा पती, तिचे आई-वडील, सासू-सासरे यांच्या विररोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे करीत आहे.

