भुसावळ-सुरत एक्स्प्रेसमध्ये अल्पवयीन तरुणीवर अत्याचार : सहा महिन्यांनी संशयीताविरोधात गुन्हा


Abuse of minor girl in Bhusawal-Surat Express: Case against suspect after six months भुसावळ (25 सप्टेंबर 2024) : भुसावळहून सुरतकडे जाणार्‍या एक्स्प्रेसमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शौचालयात अज्ञाताने अत्याचार केला होता मात्र पीडीतेने बदनामीच्या धाकाने ही बाब कुटूंबियांना सांगितली नाही मात्र पीडीतेचे पोट दुखू लागल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असता ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर घडला प्रकार समोर आला. अज्ञात प्रवाशाविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे नेमके प्रकरण
नाशिक येथून भुसावळ येथे पीडीता सुरत जाण्यासाठी आली व सुरत जाणार्‍या गाडीतून तिने प्रवास सुरू केला. भुसावळ रेल्वे स्थानक सोडल्यावर 17 वर्षीय पीडीता शौचास गेली असता शौचास मागून तोंडाला मास्क लावून एक युवक आला व त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याबाबत मुलीने काहीही माहिती तिच्या आई-वडीलांना दिली नाही मात्र आता सहा महिन्यानंतर मुलीच्या पोटात दुखी लागल्याने सुरत येथील सरकारी दवाखान्यान तपासणीला नेले असता त्या मुलीच्या पोटात गर्भ असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. यामुळे मुलीकडे पालकांनी चौकशी केल्यावर तिने भुसावळ-सुरत गाडीत अत्याचार झाल्याची कबुली दिली.

अनोळखीविरोधात गुन्हा दाखल
मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी तोंडाला मास्क बांधलेल्या व्यक्ती विरूध्द खटोदरा (जि.सुरत) येथील पोलिस ठाण्यात पोस्कोचा गुन्हा दाखल केला. तेथून हा गुन्हा लोहमार्ग पोलिस ठाण्यात सोमवार, 23 सप्टेंबरला वर्ग करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण निकाळजे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !