अमळनेर शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार : नराधमाला अटक
Abuse of minor girl in Amalner city : Murderer arrested अमळनेर (25 सप्टेंबर 2024) : राज्यात महिलांसह मुलींवर होणार्या अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. अमळनेर शहरातूनही अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. बहिणीला शाळेत सोडून घराकडे परतणार्या अल्पवयीन 16 वर्षीय बालिकेवर नराधमाने एका शाळेच्या आवारात अत्याचार केला व याबाबत वाच्यता केल्यास तिच्या कुटुंबियांना मारून ठाकण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवार, 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता घडली. संशयित आरोपीला अटक करण्यात आली.
संशयीताविरोधात पोलिसात गुन्हा
अमळनेर शहरातील एका भागात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार, 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पीडीतेने लहान बहिणीला शाळेत सोडल्यानंतर ती पायी घरी जात असतांना संशयित आरोपी दिनेश रमेश भील (अमळनेर) याने पीडीतेला रिक्षात बसवून शहरातील एका बंद शाळेच्या आवारात नेवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकेल, अशी धमकी दिली. हा प्रकार पीडीत मुलीने घरी जावून सांगितल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार देण्यात आली सायंकाळी संशयीत आरोपी दिनेश रमेश भील (अमळनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ल तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहे.