जळगावात काँक्रिट मिक्सर वाहनाच्या धडकेने भुसावळातील दुचाकीस्वार तरुण ठार


A young bike rider from Bhusawal was killed after being hit by a concrete mixer vehicle in Jalgaon जळगाव (26 सप्टेंबर 2024) : शहरात अपघातांची मालिका थांबायला तयार नाही. शहरातील महामार्गावर भरधाव वेगाने जाणार्‍या काँक्रीट मिक्सर वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवार, 25 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडला. कुणाल राजेंद्र महाले (25, रा.नाहाटा नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. मयत कुणाल हा तीन महिन्यांपूर्वीच भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात लिपिक म्हणून कामास लागला होता मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर कुटूंबावर मोठे संकट कोसळले आहे.

विद्यापीठात जात असताना गाठले मृत्यूने
भुसावळ शहरातील नाहाटा नगरात कुणाल महाले हा तरुण आई-वडील आणि लहान भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. कुणाल हा तीन महिन्यांपूर्वीच भुसावळ शहरातील के.नारखेडे महाविद्यालयात क्लर्क म्हणून नोकरीला लागला होता. महाविद्यालयाच्या कामकाजानिमित्त कुणाल महाले आणि त्याचा सहकारी निखिल शरद बर्‍हाटे भुसावळवरून विद्यापीठात जाण्यासाठी जळगाव शहरातून जात होते. त्यावेळी जळगाव शहराच्या पुढे असलेल्या जकात नाक्याजवळ भरधाव काँक्रीट मिक्सरने ट्रकने त्यांच्या दुचाकीला कट मारला या अपघातात कुणाल महाले हा रोडवर पडल्याने मागून येणार्‍या काँक्रीट मिक्सरच्या मागच्या चाकाखाली आल्याने मृत झाला तर निखील बर्‍हाटे हा किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

नातेवाईकांचा आक्रोश
अपघातानंतर नातेवाईक व महाविद्यालयातील सहकार्‍यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेत मोठा आक्रोश केला. घरातील कमवता मुलगा गेल्याने रुग्णालयात त्याच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला.


कॉपी करू नका.