साकेगाव हादरले : 26 वर्षीय महिलेचा चाकूचे वार करीत खून


Sakegaon shaken: 26-year-old woman stabbed to death भुसावळ (26 सप्टेंबर 2024) : भुसावळ तालुक्यातील 26 वर्षीय महिलेची चाकूचे वार करीत हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे. महिलेवर हल्ला होत असताना वाचवण्यासाठी पुढे आलेला सुरक्षा रक्षकही हल्ल्यात जखमी झाला आहे. खुनाची घटना बुधवार, 25 सप्टेंबरच्या रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. सोनाली महेंद्र कोळी (26, साकेगाव) असे खून झालेल्या महिलेचे तर सागर रमेश कोळी (28, साकेगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

भांडणानंतर झाली हत्या
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, सागर कोळी या संशयीताचे सोनाली कोळी या महिलेसोबत बुधवारी रात्री वाद झाला व त्यानंतर चाकूचे महिलेच्या पोटावर, पाठीवर, उजव्या हातावर वार केल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला तर हा वाद सुरू असताना तक्रारदार व सुरक्षा रक्षक विनोद सुभाष कुंभार आल्यानंतर संशयीत सागर कोळी याने तू आमच्या मध्ये पडू नकोस, असा दम देत त्याला जखमी केले. सुरक्षा रक्षकाच्या बोटाला चाकू लागला आहे.

पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड आदींनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.


कॉपी करू नका.