दहा हजारांची लाच मागणी भोवली : पारोळ्यातील मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

शैक्षणिक वर्तुळात खळबळ : चेअरमनपदी भाऊ झाल्यानंतर अधिकाराचा धाक दाखवल्याचा आरोप


Demanded bribe of ten thousand : Parola principal in ACB’s net पारोळा (26 सप्टेंबर 2024) : शाळेत चेअरमनपदी असलेल्या भावाच्या अधिकाराचा धाक दाखवून नोकरी टीकवण्यासाठी शिपायाकडून दहा हजारांची लाचेची मागणी करणार्‍या पारोळ्यातील मुख्याध्यापकाला धुळेे एसीबीने गुरुवारी सायंकाळी अटक केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गौतम बालूप्रसाद मिसर (जग मोहनदास नगर, एन. ई.एस. हायस्कूलच्या पाठीमागे, पारोळा) असे अटकेतील मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते पारोळ्यातील नागरी एज्युकेशन सोसायटी माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूलला कार्यरत आहेत.

शिपायाकडून मागितली लाच
36 वर्षीय तक्रारदार हे पारोळ्यातील संस्थेत शिपाई पदावर कार्यरत आहेत मात्र संशयीत मुख्याध्यापक गौतम मिसर यांचे बंधू मिलीन मिसर हे माध्यमिक विद्यालयात चेअरमनपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा प्रभाव पाडून तक्रारदार यांच्याकडे दहा हजारांची लाच 10 व 12 फेब्रुवारी 2024 रोजी मागण्यात आली मात्र लाचेचा संशय आल्यानंतर त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र एसीबीकडे लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर गौतम मिसर यांना गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे,
हवालदार राजन कदम, हवालदार पावरा आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.