रेल्वे गाड्यांना थांब्यासाठी वरणगावात 16 रोजी ‘रेल रोको’ आंदोलन


वरणगाव (11 ऑक्टोबर 2024) : वरणगाव रेल्वे स्थानकावर कोरोना काळापूर्वी ज्या रेल्वे गाड्या थांबत होत्या त्या गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा या मागणीसाठी वरणगावकरांच्या वतीने बुधवार, 16 ऑक्टोबर रोजी  दुपारी 12 बारा वाजता वरणगाव रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

 या मागण्यांसाठी आंदोलन
वरणगाव येथे अप-डाऊन सेवाग्राम एक्स्प्रेसला थांबा मिळावा, सुरत-अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेसला, महाराष्ट्र एक्सप्रेसला थांबा द्यावा तसेच मेमूच्या अप-डाऊन फेर्‍या वाढवाव्यात, अजमेर एक्सप्रेला थांबा द्यावा, सिद्धेश्वर नगराकडे जाण्यासाठी अंडर बायपास पूल करावा, नागेश्वर रेल्वे पुलाजवळ उड्डाणपूल करावा, वरणगाव रेल्वे स्थानकावर रिझर्वेशन खिडकी सुरू करावी, साई नगर -पुरी एक्स्प्रेसला तसेच अमरावती-पुणे एक्सप्रेस थांबा मिळावा आदी मागण्यासाठी बुधवारी दुपारी 12 वाजता रेल रोको आंदोलन करण्यात येणार  आहे. आंदोलनात वरणगावकरांनी व वरणगाव तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नानाभाऊ चौधरी, सरचिटणीस योगेश माळी, महाजन, सुनील माळी, उप नगराध्यक्ष शेख अखलाख, कामगार नेते मिलिंद मेढे यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !