भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये पतंग महोत्सव


भुसावळ (15 जानेवारी 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मकर संक्रांतीनिमित्त पतंग महोत्सवाचा कार्यक्रम झाला. शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांना पतंग देण्यात आल्या. प्रिन्सिपल निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना पतंगांचे वाटप केले.

विद्यार्थ्यांनी शाळेतील मैदानावर पतंग उडवत पतंग महोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला. शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर यांनी मकर संक्रांती व पतंग महोत्सवाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी शाळेच्या चीफ ओएस सविता सहजे, शाळेच्या व्हाईस प्रिन्सिपल मनप्रीत कौर, एनेक मॅथ्यू, स्मिता जाधव, राहुल नेमाडे, विजय संकत, अर्जुन सणस आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !