रावेरात उद्यापासून रंगपंचमी व्याख्यानमाला

व्याख्यानमालेचे 23 वे वर्ष : नामवंत वक्त्यांच्या व्याख्यानातून मिळणार ज्ञानाची ऊब


रावेर (15 जानेवारी 2025) : शहरात रंगपंचमी व्याख्यानमालेला गुरुवार, 16 पासून सुरूवात होत आहे. या माध्यमातून शहर आणि परिसरातील रसिकांना एकाहून एक दर्जेदार व्याख्यानांची मेजवानीच मिळणार आहे. रंगपंचमी व्याख्यानमालेला 22 वर्षे पूर्ण झाली असून या माध्यमातून आतापर्यंत 110 व्याख्याने पूर्ण झाली आहेत. व्याख्यानमालेचे हे 23 वे वर्ष आहे.

या वक्त्यांची होणार व्याख्याने
गुरुवार, 16 रोजी पहिले ‘पुष्प चला, स्वतःला घडवू’ या विषयावर दुपारी एक वाजता वक्ते संदीप जगताप हे स्वामी विवेकानंद विद्या मंदिरातील रा.का.पवार सभागृहात गुंफतील.

दुसरे पुष्प शुक्रवार, 17 रोजी दुपारी दोन वाजता वक्ते वसंत हंकारे हे ‘आई-बाप समजून घेताना’ या विषयावर सौ.कमलाबाई एस अग्रवाल गर्ल्स हायस्कूलमध्ये गुंफतील.

तिसरे पुष्प शनिवार, 18 रोजी सकाळी नऊ वाजता वक्ते मयूर भावे (पुणे) हे ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या विषयावर प्रकाश विद्यालय, वाघोदा येथे गुंफतील.

चौथे पुष्प रविवार, 19 रोजी सायंकाळी 6.30 वाजता ऋचा थत्ते या ‘वाल्मिकी रामायणातील निवडक गोष्टी’ या विषयावर जिमखाना हॉल, सौ.के.एस.ए.गर्ल्स हायस्कूल, रावेर येथे गुंफतील.

पाचवे पुष्प शनिवार, 25 रोजी सकाळी 8.30 वाजता ऑलिंपिक वीर तिरंदाज प्रवीण जाधव (सातारा) ‘मी कसा घडलो? प्रकट मुलाखत’ या विषयावर सौ.के.एस.ए.गर्ल्स हायस्कूल, रावेर येथे गुंफतील. व्याख्यानांना उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त डॉ.राजेंद्र आठवले, दिलीप वैद्य, अध्यक्ष विठोबा पाटील, सचिव बाळकृष्ण पाटील व संचालक मंडळाने केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !