जळगावात मुदतबाह्य दुध व दुग्धजन्य अन्न पदार्थाचा साठा नष्ट
अन्न व औषध प्रशासनाच्या डक कारवाईने उडाली खळबळ
Stock of expired milk and dairy products destroyed in Jalgaon जळगाव (15 जानेवारी 2025) : जळगाव जिल्ह्यात बुधवार, 15 जानेवारी रोजी विशेष मोहिम राबवून विविध आस्थापनांची तपासणी करुन दुध या अन्न पदार्थांच्या विविध ब्रॅण्डचे एकूण 14 नमुने विश्लेषणास्तव घेण्यात आले. त्यासमवेत मे. रविराज एजन्सी, विसनजी नगर, जळगाव यांच्याकडे दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा सुमारे चार हजार 95 रुपयांचा साठा हा मुदत बाह्य असल्याचा आढळून आल्यामुळे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीकोनातून पुर्नवापर होवू नये म्हणून तत्काळ विक्रेता यांच्या समोरच हा साठा नष्ट करण्यात आला. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नियम व नियमावली अंतर्गत पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली.े.
यांनी केली कारवाई
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेशजी नार्वेकर, सहआयुक्त (नाशिक विभाग) म.ना.चौधरी, जळगाव जिल्ह्याचे सहायक आयुक्त (अन्न) सं.कृ.कांबळे व अन्न सुरक्षा अधिकारी कि.आ.साळुंके व श.म.पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे सहायक आयुक्त (अन्न) सं.कृ.कांबळे यांनी दिली.
भुसावळात कारवाई कधी ?
शहरातील विविध दुध डेअर्यांसह हॉटेलची अन्न व औषध प्रशासनाने तपासणी करून दुध व दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा दर्जा तपासावा, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.






