मकरसंक्रांतीचा सण संस्काराचे प्रतीक : प्राचार्य आर.पी.फालक


भुसावळ (16 जानेवारी 2025) : संक्रांतीचा सण हा प्रत्येक वर्षातील पहिला सण असतो. भौगोलिकृदृष्ट्या या काळात उत्तरायणाचा आरंभ होत असतो. आपल्या संस्कृतीमध्ये मांगल्याचे प्रतीक मानल्या जाणार्‍या हळदी कुंकवाच्या सणाच्या माध्यमांतून तो सहारा होतो. आपल्या संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीकडे नेण्याच्या संस्काराचे प्रतीक म्हणून हा सण महाविद्यालयात साजरा करण्यात येतो, असे विचार प्राचार्य आर.पी.फालक यांनी येथे व्यक्त केले.

दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकताच संक्रांतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. समुपदेशक आरती चौधरी या प्रमुख पाहुण्या म्हणून तर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्राचार्य डॉ.आर.पी.फालक अध्यक्षस्थानी होते.

वाण देणे म्हणजे त्यागाने शरण जाणे : आरती चौधरी
आरती चौधरी यांनी संक्रांतीच्या दरम्यान करण्यात येणार्‍या हळदी कुंकवाच्या समारंभाचे आणि वाण देण्याचे महत्व स्पष्ट करताना सांगितले की, वाण देणे म्हणजे सुवसिनीच्या रुपात घरी आलेल्या दुसर्‍या जीवनातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागाने शरण जाणे. संक्रांतीच्या काळात दिलेल्या वाणामुळे देवता लवकर प्रसन्न होऊन देणार्‍याला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच आपले दान सत्कारणी लागते, असे सांगितले.

प्रास्ताविक सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या अध्यक्ष प्रा.श्रेया चौधरी यांनी तर आभार प्रा.डॉ.जयश्री सरोदे व सूत्र संचालन प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी केले. प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.जागृती सरोदे, प्रा.आरती नवघरे, प्रा.सुशीला भाटे, प्रा.धनश्री नेहेते, प्रा.ऐश्वर्या वासकर उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !