भुसावळ नाहाटा महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय परिषद


भुसावळ (17 जानेवारी 2025) : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे सलग दहाव्यांदा एक दिवसीय राष्ट्रीय परिषद बुधवार, 15 रोजी झाली. 40 संशोधकानी आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले.

अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशनचे अध्यक्ष मोहन फालक होते. चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, प्रभारी प्राचार्य डॉ.सुनील व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, कनिष्ट महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.योगेश एम.पाटील, संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ.गजेंद्र आर.वाणी, डॉ.गौरी एम.पाटील आयोजन समिती सचिव प्रा.हर्षल व्ही पाटील, डॉ.स्वाती फालक, प्रा.पूनम महाजन, जी.जी.खडसे महाविद्यालयाच्या डॉ.वंदना व्ही.चौधरी यांची उपस्थिती होती.

परीषद एकूण तीन सत्रात झाली. उद्घाटनप्रसंगी सूत्रसंचालन प्रा.पूनम महाजन व प्रा.मेघा चौधरी यांनी केले तर आभार प्रा.हर्षल पाटील यांनी मानले. प्राथम सत्रात प्रा.डॉ.वंदना व्हीचौधरी यांची बीजभाषण झाले. त्यांनी इमेज प्रोसोसींग फ्रॉम पिक्सेल टू इनसाइटस या विषयावर सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. दुपार सत्रात संशोधकांनी शोधनिबंधाचे वाचन केले. तिसरे व परीषदेचे समारोपाचे शेवटचे सत्र सायंकाळी झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे होते. संपूर्ण परीषदेचे संयोजक उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, डॉ.गजेंद्र आर.वाणी, डॉ.गौरी एम.पाटील, आयोजन समिती सचिव प्रा.हर्षल व्ही.पाटील, डॉ.स्वाती फालक, प्रा.पूनम महाजन व सर्व संगणक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !