भुसावळातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे भोळे महाविद्यालयात साडी डे साजरा
Sari Day celebrated at Dadasaheb Devidas Namdev Bhole Bhole College in Bhusawal भुसावळ (20 जानेवारी 2025) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात सांस्कृतिक समितीतर्फे नुकताच साडी डे आयोजित करण्यात आला. विद्यार्थिनींनी आपला पारंपरिक वेष साडी परिधान करून महाविद्यालयात हजेरी दिली.
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी यावेळी विद्यार्थिनींना भारतीय संस्कृतीचे महत्व विषद केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या अध्यक्ष प्रा.श्रेया चौधरी यांनी केले. प्रसंगी प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.जागृती सरोदे, प्रा.आरती नवघरे, प्रा.सुशीला भाटे, प्रा.धनश्री नेहेते, प्रा.ऐश्वर्या वासकर, प्रा.डॉ संजय बाविस्कर, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण उपस्थित होत्या.