ताप्ती पब्लिक स्कुलमध्ये दोन दिवशीय स्नेहसंमेलन उत्साहात
कष्टाने मिळवलेले गुण नेहमीच स्मरणात : मंत्री संजय सावकारे
भुसावळ (28 जानेवारी 2025) : ताप्ती पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जवाहर नवोदयचे प्राचार्य आर.आर.खंडारे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे उपस्थित होत्या. व्यासपीठावर ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी, प्रिन्सिपल निना कटलर उपस्थित होत्या.
यशासाठी अभ्यास गरजेचा : मंत्री सावकारे
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, स्वतःच्या मेहनतीने मिळवलेले मार्क हे कधीही चिरकार स्मरणात राहतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास व शिक्षण गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांना मेहनत करायला शिकवायला हवे. भुसावळतील ताप्ती पब्लीक स्कूल ही नामांकीत संस्था आहे. मुलांचं मन सांभाळायला हवे कारण आपण जुन्या विचारायचे आहोत आणि आताची मुले नवीन विचारांची आहेत त्यामुळे सांगड कशी घालायची हे शिकलं पाहिजे. जवाहर नवोदयचे प्राचार्य आर.आर.खंडारे व ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले. प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध गीतांवर नृत्य सादर करून आपले कला गुण सादर केले. भारतीय संस्कृतीवर विविध प्रकारची नृत्य करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन सोफीया पी.बॉडी व शेख कय्युम यांनी तर आभार प्रिन्सिपल निंना कटलर यांनी मानले.






