भुसावळातील कोटेचा महिला महाविद्यालयात प्रभात फेरीच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेबद्दल जनजागृती


भुसावळ (29 जानेवारी 2025) : वाहन चालकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याकरीता श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी आवरा वेगाला, सावरा जीवाला, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, वेग कमी, जीवनाची हमी आदी रस्ता सुरक्षेबद्दल घोषणा देण्यात आल्या.

प्रभात फेरीचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.शरद अग्रवाल यांनी केले. प्रभात फेरीच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ.मीना चौधरी, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा.संदीप नेतनराव, प्रा.निलेश गुरूचल यांनी परिश्रम घेतले. प्रभात फेरीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकांनी मोठ्या संख्येत उत्साहात सहभाग घेतला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !