साहित्य लेखनासाठी भोवतालचे विश्व ठावूक हवे : सदानंद देशमुख


भुसावळ (3 फेब्रुवारी 2025) : साहित्यात जर आपल्याला लेखन करायचे असेल तर आपल्या भोवतालचे विश्व आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. ज्या भागात आपण राहतो तेथील शेती-भाती, परंपरा, सण-उत्सव तेथील बोली माहिती असणे आवश्यक आहे. याबरोबरच निसर्गाशी असलेले नाते आणि मानव यांचा समन्वय आपल्याला साधता आला पाहिजे, असे विचार ख्यातनाम लेखक, कथाकार कादंबरीकार, कवी सदानंद देशमुख यांनी व्यक्त केले. शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात षमराठी विभाग आणि कला वाड.मय मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेखक आपल्या भेटीला हा कार्यक्रमात ते बोलत होते.

भाव-भावनांचे कांगोरे उलगडवावेत
सदानदं देशमुख म्हणाले की, शेतीत राबणारे कष्ट करणारे शेतकरी, शेतमजूर, पिके यांचा मानवाशी खूप जवळचा संबंध येतो. या संबंधाची उकल करताना मानवांच्या भाव-भावनांचे कांगोरे उलगडले गेले पाहिजे. त्यातून कष्टकर्‍यांची घुसमट, शेतीत राबणार्‍या स्त्रियांचे मनाचे ठाव, व्यापारींनी शेतकर्‍याची केलेली अडवणूक, बी-बियाण्यात असलेली भेसळ यामुळे होणारे शेतीचे नुकसान यातून उद्विग्न झालेले शेतकर्‍याच्या मनाचा ठाव आपल्याला घेता आला पाहिजे. मी शिकत असतानापासून शेतीत राबणारा व्यक्ती आहे नंतर नोकरी करत असताना माझी नाळ कायम शेतीशी जुळली. साहित्याच्या निर्मितीपासून तर तहान, बारोमास, चारीमारी कादंबरी आणि खुदळघास,रगडा, महालूट, लचांड, बाभूळगाभा, अशा कथासंग्रह पर्यंतचा पूर्ण प्रवास त्यांनी विद्यार्थिनींना उघडून दाखवला.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा.विनोद भालेराव यांनी केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.जान्हवी तळेगावकर होत्या. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.के.अग्रवाल उपस्थित होते. आभार मराठी विभागाच्या प्रा. भावना संकोपाळ यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.निलेश गुरचल, डॉ.गिरीश कोळी, प्रा.गिरीश सरोदे, प्रदीप चौधरी, नितीन चौधरी, शिवदास कोळी, मनोज खरारे यांनी परिश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !