चोपडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Minor girl raped in Chopda taluka चोपडा (3 ऑगस्ट 2025) : चोपडा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीनावर अत्याचार करण्यात आल्याने समाजमन संतप्त झाले आहे. लघू शंकेसाठी रात्री घराच्या बाहेर अंगणात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर पाळत ठेवत गावातील तरुणाने मुलीचे तोंड दाबून एका बंद घरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. संशयित तरुणाला चोपडा ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच अटक केली.
सातपुड्यातील एका गावात आदिवासी कुटुंब मुलाबाळांसह वास्तव्यास असून 31 जुलै रोजी रात्री कुटुंबातील सर्वजण झोपी गेले. रात्री 11 वाजता 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी लघुशंकेसाठी घराच्या बाहेर अंगणात आली असता ती घरात परत आलीच नाही त्यामुळे मुलीच्या वडिलांनी रात्रभर गावात शोधाशोध केली. शोधाशोध करूनही ही मुलगी कुठेच आढळून आली नाही. आई-वडिलांसह सर्वच कुटुंब चिंतेत असताना अंधारात ही मुलगी शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घाबरलेल्या अवस्थेत रडत घरी परतली. यावेळी वडिलांनी तिला विचारले असता तिने एका बंद असलेल्या घरात तब्बल पाच तास डांबून ठेवत पहाटे चार वाजेपर्यंत अत्याचार केल्याचे सांगितले.





अत्याचाराच्या घटनेने कुटुंब हादरले आहे. याबाबत शनिवारी मुलीच्या वडिलांनी मुलीसह पोलिस ठाणे गाठले व याबाबत फिर्याद दाखल केली. त्यावरून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयासमोर हजर त्याला करण्यात आले.
तपास डीवायएसपी आण्णासाहेब घोलप, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शेषराव नितनवरे करीत आहेत.
