भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा उत्साहात


भुसावळ (2 सप्टेंबर 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात शारीरीक शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरवर्गीय बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी खेळाडू यांनी सहभाग घेतला. आंतर महाविद्यालयीन स्पर्धेसाठी खेळाडूची निवड केली जाणार आहे. यावेळी प्राचार्य परिषदेचे जळगाव विभाग उपाध्यक्ष डॉ.राजू फालक यांच्याहस्ते बुद्धिबळ व कॅरम खेळाचे खेळून उद्घाटन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.दीपक जैस्वार, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.खिलचंद धांडे, प्रकाश सावळे व विद्यार्थी खेळाडू उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !