भुसावळातील ई मिलिदच्या मिरवणूक मार्गाची व्हावी दुरुस्ती : पालिका प्रशासनला साकडे
भुसावळ (2 सप्टेंबर 2025) : भुसावळ शहरात ई मिलिदच्या पार्श्वभूमीवर जुलूस (मिरवणूक) काढण्यात येणार असून मार्गाची व्हावी दुरुस्ती व्हावी, अशी मागणी भुसावळ शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागातर्फे मुख्याधिकारी राजेंद्र फातले व प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात ईद मिलाद-उन-नबीच्या मुख्य जुलूस मार्गाची दुरूस्ती करावी तसेच अमरदीप चौक, मटन मार्केट, शिवाजी नगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यादरम्यान रस्त्याची डागडूजी करण्याची मागणी करण्या आली.








