कुसुंब्यातील अल्पवयीन मुलीला पळवले
जळगाव : 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना कुसुंबा येथे शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. कुसुंबा येथील एका कुटुंबातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात नसल्याची बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती न आढळल्याने जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात पालकांनी धाव घेत तक्रार दिली.

