मुंबई ते वाराणसी दरम्यान विशेष गाडी


भुसावळ : मुंबई ते वाराणसी दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 02193 सुपरफास्ट विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दररोज रात्री 12.10 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 3.30 वाजता वाराणसी येथे पोहोचणार आहे. 02194 सुपरफास्ट स्पेशल वाराणसी ट्रेन येथून पुढच्या आदेशापर्यंत सकाळी 10 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी 11.25 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बर्‍हाणपूर, खंडवा, इटारसी, पिपरीया, नरसिंहपूर, श्रीधाम, मदन महल (केवळ 02193 साठी), जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चिवकी, विंध्याचल, मिर्जापूर, चुनार, काशी येथे थांबा देण्यात आला आहे. दरम्यान, 01093/01094 मुंबई-वाराणसी विशेष रेल्वेचा क्रमांक 1 डिसेंबरपासून नवीन नंबर 02193/02194 सुपरफास्ट म्हणून करण्यात आला आहे. आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना या गाडीत प्रवेश मिळणार असून प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !