भुसावळात घरगुती वादातून मेहुण्याचा शालकावर चाकुहल्ला
भुसावळ : बहिणीच्या चारीत्र्यावर संशय घेणार्या मेहुण्याला जाब विचारल्याने, मेहुण्याने संतापाच्या भरात शालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी संशयीत मेहुण्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. शेख सलमान (भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील किसन नगरातील रहिवासी अनिस अ.मजिद याच्या मामे बहिणीच्या चारीत्र्यावर तिचा पती शेख सलमान संशय घेत असल्याने शालक अनिस अ. मजीदने मेहुणा शेख सलमान यास जाब विचारला. त्याचा राग आल्याने संशयीत आरोपी शेख सलमान याने शालक अनिस याच्या पोटावर, डोक्यावर, छातीवर आणि दंडावर चाकूने वार केले तसेच शिविगाळ करत दमदाटी केली. या घटनेत अनिस जखमी झाला. त्याच्यावर डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात संशयीत मेहुणा शेख सलमानविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली. याप्रकरणी सहा.पोलिस निरीक्षक कृष्णा भोये, रवींद्र तायडे पुढील तपास करीत आहेत.

