दोघा अनोळखी पुरूषांची ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
भुसावळ : वेगवेगळ्या घटनेत मयत झालेल्या दोघा अनोळखींची ओळख पटवण्याचे आवाहन बाजारपेठ पोलिसांनी केले आहे. शहरातील बसस्थानकाजवळ ए वन नारळ दुकानासमोर 60 वर्षीय पुरूषाचा मृतदेह 24 सप्टेंबर 2020 रोजी आढळला होता. या प्रकरणी प्रकाश कचरू शिरसागर (48, अण्णाभाऊ साठे नगर, भुसावळ) यांच्या खबरीनुसार बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शरीराने सडपातळ, रंग गव्हाळ, चेहरा उभट, नाक लांब, डोक्यावर काळे-पांढरे केस, मिशी व दाढी बारीक काळी-पांढरी असे मयताचे वर्णन आहे. ओळख पटत असल्यास बाजारपेठचे नाईक यासीन सत्तार पिंजारी यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे. दुसर्या घटनेत शहरातील मॉडर्न रोडवरील कैलास शॉपीसमोर 50 वर्षीय भिकार्याचा 23 सप्टेंबर रोजी मृीदेह आढळला होता. या प्रकरणी सुधीर त्र्यंबक शिंगारे (55, सरस्वती नगर, डी.एल.हिंदी हायस्कूलमागे, भुसावळ) यांच्या खबरीनुसार बाजारपेठ पोलिसात नोंद करण्यात आली होती. शरीराने सडपातळ, रंग गव्हाळ, नाक लांब, डोक्यावर काळे-पांढरे केस, अंगात राखाडी रंगाची मळकट फाटलेली पँट असे मयताचे वर्णन आहे. ओळख पटत असल्यास बाजारपेठचे नाईक यासीन सत्तार पिंजारी यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.

