बाप आणि आईच्या सावलीला, वंदन ‘त्या’ भीम माऊलीला !
भुसावळ शहरासह विभागात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विविध कार्यक्रमातून अभिवादन
भुसावळ : घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिननिमित्त शहर व विभागात अभिवादन करण्यात आले. भुसावळ शहरातील जुन्या पालिकेसमोरील महामानवाच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिवसभर गर्दी झाली होती. यानिमित्त व्याख्यानासह विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.
भुसावळात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
भुसावळ : घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाणदिनानिमित्त भुसावळ शहर काँग्रेस अनु.जाती विभागाद्वारे अभिवादन करण्यात आले. भुसावळ पालिकेच्या जुन्या कार्यालयासमोरील महामानव डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पदाधिकार्यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, उपाध्यक्ष ईस्माईल गवळी, अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जोहरे, उपाध्यक्ष विनोद पवार, कुणाल सुरळकर, राहुल कडेरे, गोलू बगाडे, गोलू इंगोले, भिमराव सपकाळे, विश्वनाथ गायकवाड, वेणूबाई तायडे, कल्पना इंगळे, अनिता सावळे, मयुर साळवे आदी उपस्थित होते.

वंशिका प्रतिष्ठान, भुसावळ
भुसावळ : शहरातील वंशिका प्रतिष्ठानतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाच्या निमित्ताने हॉटल यशोदामागील माता यशोधरा नगरात व्याख्यान झाले. महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक वंशिका प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक नरवाडे यांनी केले. प्रमुख वक्ते प्रवीण नायसे यांनी समृद्ध भारताच्या जडण-घडणीत महामानवांच्या अनमोल योगदानाची माहिती दिली. डॉ.जगदीश पाटील, प्रा.प्रशांत नरवाडे, निलेश रायपूरे, संघदीप नरवाडे व संदीप पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संभाजी सोनवणे तर आभार राजू सपकाळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मुकेश सपकाळे, प्रवीण बोदवडे, अनिल सपकाळे, अनिल सावळे, दिलीप क्षीरसागर, सतीश नवघरे आदींनी परीश्रम घेतले.
दे.ना.भोळे महाविद्यालय
भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महापरीनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब अांबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर यांनी प्रार्थना म्हटली. सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.जी.पी.वाघुळदे तर आभार सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दयाधन राणे यांनी मानले. प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, वाय.डी.चौधरी, प्रकाश चौधरी व सुधाकर चौधरी उपस्थित होते.
मुक्ताईनगर शहरात महामानवास अभिवादन
मुक्ताईनगर : शहरातील परीवर्तन चौकाती महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, मनोहर खैरनार, धनंजय सापधरे, मुकेश घुगे, भीमराव वाहुळे, गणेश मनुरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दिवसभर अभिवादनासाठी उसळली गर्दी
मुक्ताईनगरातील परीवर्तन चौकात दिवसभर बौद्ध उपासक, भीम सैनिक, विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व दि बुद्धिस्ट सोसायटीचे पदाधिकारी, बौद्धाचार्य आदींनी दिवसभर अभिवादनासाठी गर्दी केली. बी.डी.गवई यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी महाराष्ट्राचे प्रख्यात गायक प्रतापसिंग बोदडे, नगराध्यक्षा नजमा तडवी, नगराध्यक्ष पती इरफान तडवी, समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, पोलिस पाटील मोहन मेढे, दि बुद्धिस्ट सोसायटीचे तालुकाध्यक्ष शरद बोदडे, सचिव चंद्रमणी इंगळे, आर.के.गणेश, माजी सभापती संतोष बोदडे, रवींद्र बोदडे, अनिल बोदडे, सुधाकर बोदडे, रमेश बोदडे, विशाल गणेश, विश्वनाथ गणेश, रोहित गणेश, परीवर्तन कलामंच तालुकाध्यक्ष सखाराम हिरोळे, भिवाजी तायडे, गोविंदराव कोसोदे, भीमराव पवार, निलेश मेढे, निर्मल भालेराव, बापू ससाणे, राजु बोदडे, शाहीर आर.आर.धुरंधर, जगदेव इंगळे, अनिल बोदडे आदी तमाम बौद्ध उपासक बांधव उपस्थित होते.
आमदार पत्नींसह महिलांनीही केले अभिवादन
मुक्ताईनगर : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सौभाग्यवती यामिनी चंद्रकांत पाटील यांच्यासह सविता भलभले, कल्पना पालवे, सुषमा शिरसाट, शोभा कोळी, सरीता कोळी, विद्या भालशंकर, यशोदा माळी, ज्योती मालचे, छोटू भोई, मनोहर खैरनार, डॉ.जगदीश पाटील, आत्माराम जाधव, पवन खुरपुडे, बाळा भालशंकर, राजेंद्र हिवराळे, प्रफुल्ल पाटील, शुभम शर्मा आदींची उपस्थिती होती.

