वरणगावमध्ये भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद


महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी शहरात फिरून दुकानदारांना बंदचे केले आवाहन

वरणगाव : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. वरणगाव शहरात दुकानदारांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या बंदच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शंभर टक्के दुकाने बंद ठेवली. मंगळवारी शहराचा आठवडे बाजार असलातरी दुकानदार, व्यापारी, टपरीधारक, लोटगाडीधारक यांनी शेतकर्‍यांनी पुकारलेल्या भारत बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला. मंगळवारी सकाळी महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी शहरात फिरून दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले परंतु दुकानदारांनी स्वतः स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेऊन भारत बंदला प्रतिसाद दिला. महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी शहरात फिरून बस स्थानक चौकात आल्यावर केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात घोषणाबाजी केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेनेचे भुसावळ तालुकाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक विलास मुळे, शहराध्यक्ष रवी सुतार, पंचायत समिती सदस्य सुधाकर सुरवाडे, सुरेश चौधरी, सईद मुल्ला, सुनील भोई, अमर सोनार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी, जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, गजानन वंजारी, अनिल चौधरी, पप्पू जकातदार, माजी नगरसेवक विष्णू खोले, रवींद्र सोनवणे, समाधान चौधरी, इफ्तेखार मिर्जा, गणेश चौधरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अशफाक काझी, मनोज देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश भैसे, मुस्लिम अन्सारी, शैलेश बोदडे, दिलकश अन्सारी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !