भारत बंदला राष्ट्रीय दलित पँथरचा पाठिंबा
शेतकरी आंदोलन दडपू पाहणार्या केंद्र सरकारचा निषेध
भुसावळ : शेतकर्यांच्या न्याय मागण्यांसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला भारत बंदला राष्ट्रीय दलित पँथरने पाठिंबा दर्शवला असून शेतकरी आंदोलन दडपू पाहणार्या केंद्र सरकारचा निषेध केला. या संदर्भात प्रांताधिकारी प्रशासनाला मंगळवारी निवेदन देण्यात आले. शेतकरी विरोधी पारीत करण्यात आलेले तीनही काळे कायदे रद्द करण्याची मागणी प्रसंगी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, जिल्हाप्रमुख सुदाम सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष छोटेलाल हरणे, जिल्हा उपाध्यक्ष भीमराव वाघ, युवा जिल्हा उपाध्यक्ष लोकेश सपकाळे, शहर उपाध्यक्ष सुनील रायमळे, शांताराम नरवाडे, अल्केश मोरे, अनिल कोपरेकर, हिरालाल गौर, शहराध्यक्ष राजू तायडे यांची उपस्थिती होती.


