रावेर शहरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद


रावेर : अन्यायकारक कृषी विधेयक लागू करण्यात आल्याने मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. रावेर शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मंगळवारी दुपारी एक वाजेनंतर काही व्यापार्‍यांनी दुकाने उघडली होती तर नागझिरी ,अग्रसेन महाराज चौकात दुकाने उघडी होती. मुख्य रस्त्यावरील सकाळी अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद होती. भारत बंदची माहिती शेतकर्‍यांना असल्याने बाजार समितीत शेतकरी फिरकलेच नाहीत. बंदचा परिणाम म्हणून बाजार समितीत शुकशुकाट दिसून आला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सोपान पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, डॉ.राजेंद्र पाटील, महेमूद शेख, राजू सवर्णे, मिलिंद पाटील, राष्ट्रीय मूलनिवासी पक्षाचे दिलीप कांबळे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी व्यावसायीकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !