बोदवड शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद


बोदवड : शहरात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांनी एका संकुलाबाहेर दोन वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण केले व नंतर तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदन दिले. उपोषणस्थळी बुधा जाट, सागर पाटील, सुभाष देवकर, विनोद मायकर, विजयसिंग पाटील, संजय पाटील, सागर शेजोळे, रवी कुकडे उपस्थित होते. यावेळी संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी, बहुजन क्रांती मोर्चा, स्वाभाविक शेतकरी संघटनेने पाठिंबा दर्शवला. भारत बंद बाबत स्व.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दगडु शेळके यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, केंद्र सरकारने मंजूर केलेला कृषी विधेयक कायदा शेतकर्‍यांना स्वातंत्र्य देणारा असून त्या कायद्यात काही दुरुस्त्या असल्याने सर्व संघटनांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून त्या दूर कराव्यात, असेही ते म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !