डीसीपीएस धारकांना आपल्या रेकॉर्डची अपडेट प्रत मिळणार


जळगाव शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांची ग्वाही

जळगाव : शहरातील ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांच्याहस्ते वेतन पथक कार्यालयाच्या अधिकृत संकेत स्थळाचे औपचारीक उद्घाटन करण्यात आले. या संकेतस्थळामुळे जिल्हाभरातील तमाम डीसीपीएस धारक माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना त्यांच्या 2016-17 ते 2019-20 या कालखंडातील मासिक कपातीच्या व्याजासह जमा रकमेच्या पावत्या मिळणे सोयीस्कर झाले आहे. लवकरच भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या देखील सदर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शिक्षकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

यांची होती उपस्थिती
संकेतस्थळ उद्घाटन प्रसंगी वेतन पथक अधीक्षक शर्मा, लेखाधिकारी हेमंत निंबाळकर, रवींद्र घोंगे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.के.पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुनील सोनार, सचिव प्रा.शैलेश राणे, प्रा.नंदन वळींकार, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.अतुल इंगळे, शहर तालुकाध्यक्ष जळगाव जिल्हा शिक्षकेतर महामंडळ ईश्वर बुधा चव्हाण, जळगाव जिल्हा शिक्षकेतर महामंडळ जिल्हा उपाध्यक्ष संभाजी देविदास अखाट, तालुका कार्यकारी अध्यक्ष लक्ष्मण विठ्ठल जाधव, विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर संघटना विजय प्रभाकर पवार, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर संघटना वैशाली नरेंद्र महाजन, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेचे योगेश भोईटे, गोपाळ पाचवणे, भूषण पवार, महेंद्र पाटील, अब्दुल तडवी, महेश पाटील, रतन खंबायत, सी.सी.महाले, सागर गाजरे, ललित खुशाल किरंगे, साळुंखे, प्रा.अतुल इंगळे नेमीचंद झोपे उपस्थित होते.


हिशोब देणे बंधनकारक
जिल्हा परीषद माध्यमिक शिक्षण विभाग व वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाच्या वतीने 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय आणि निमशासकीय सेवेत आलेल्या तमाम डीसीपीएस धारक बंधू-भगिनींना द्यावयाच्या त्यांच्या मासिक कपातीचा हिशोब 31 डिसेंबर 2020 पूर्वी देणे बंधनकारक आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !