कामाख्या व गुवाहाटी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल
भुसावळ : लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या तसेच लोकमान्य टिळक-टर्मिनस गुवाहाटी विशेष गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला असून पूर्णपणे आरक्षित असलेल्या या गाडीत कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या एक्स्प्रेस
डाऊन 02519 लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या एक्स्प्रेसच्या 13 डिसेंबरपासून दर रविवारी प्रस्थान स्टेशनहुन 7.50 वाजता सुटल्यानंतर तिसर्या दिवशी कामाख्या स्टेशनवर 4.20 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 02520 कामाख्या-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 10 डिसेंबरपासून प्रत्येक गुरुवारी प्रस्थान स्टेशनहुन 9 वाजता प्रस्थान करेल आणि तिसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस 3.10 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड व नाशिक रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस-गुवाहाटी विशेष गाडी
डाऊन 05645 लोकमान्य टिळक टर्मिनस-गुवाहाटी एक्स्प्रेस 12 डिसेंबरपासून दर बुधवारी व शनिवारी प्रस्थान स्टेशनहुन 8.05 वाजता सुटल्यानंतर तिसर्या दिवशी गुवाहाटी स्टेशनवर 12 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक, मनमाड, भुसावळ, बर्हाणपूर, खंडवा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 05646 गुवाहाटी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 9 डिसेंबरपासून दर दिवशी रविवारी व बुधवारी प्रस्थान स्थानकावरून 4.55 वाजता सुटल्यानंतर तिसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसवर 5.50 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, बर्हाणपूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

