भुसावळात उद्या आयएमएतर्फे दवाखाने बंद
भुसावळ : आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथीक शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या केंद्रीय सरकारच्या अधिसूचनेविरूध्द आयएमएने राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरू केले असून याच पार्श्वभुमीवर 11 डिसेंबरला शुक्रवारी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. यात सहा लाख आयएमए सदस्य सक्रीय सहभागी होणार आहे. सीसीआयएमने आधुनिक वैद्यकीय शल्यक्रीयांचे नामांतर संस्कृत शब्दात करून आणि या सर्व मूळ आयुवैद शस्त्रक्रीया असल्याचा खोटा दावा केला आहे. याच पार्श्वभुमीवर आयएमएतर्फे सरकारकडे मागण्या केल्या आहे. यातसीसीआयएमची अधिसूचना मागे घ्यावी, राष्ट्रीय वैद्यकीय परीरषदेने अशी सरमिसळ करण्यासाठी तयार केलेल्या चार समित्या रद्द कराव्यात, सीसीआयएमच्या अधिसूचनेच्या अंतीम दृष्षपरिणाम रूग्णांच्या आयुष्यावर व आरोग्यावर होणार असल्याने आयएमतर्फे देशभरात नागरीकांमध्ये जागृती केली जाणोर आहे. 11 डिसेंबरला दवाखाने, क्लिनीक आणि ओपीडीच्या सेवा सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळात बंद ठेवल्या जाणार आहे. सरकारच्या निर्णयाचा हा परीणाम लोकांपर्यत पोचविणे हाच या मागील उद्देश आहे. शासकीय व खाजगी महाविद्यालयातील पदवीपूर्व आणि पदव्यत्तर वैद्यकीय विद्यार्थी या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतील आदी मागण्या आयएमएच्या आहे. शुक्रवारी शहरातील सर्वच दवाखाने, हॉस्पीटल बंद ठेवले जाणार असल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. नितीन पाटील व सेक्रेटरी डॉ.विरेंद्र झांबरे यांनी कळविले आहे.

