अश्लील व्हिडिओचा धाक दाखवत धर्मांतर करीत लावले लग्न : चौघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : नाशिक येथील महिलेस अश्लील व्हिडीओचा धाक दाखवत धर्मांतर करीत लग्न लावल्याची धक्कादायक घटना नेरीदिगर, ता.जामनेर येथे घडली असून या प्रकरणी वासनांध बाबासह चौघांविरुद्ध जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा
अल्ताफ मोहसीन मनियार उर्फ अलीबाबा (रा.नेरी दिगर ता.जामनेर) या बाबासह ताहेर रीहासत शेख, सोहेल अंसारी (सर्व रा. मालेगांव) व श्रुती दिलीप सतडेकर (रा. मुंबई) अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेने सांगितलेल्या आपबीतीनुसार, सन 2017 मध्ये तिला एका महिलेने अलिबाबा याचा मोबाईल नंबर दिला. तुमचा कौटुंबिक कलह मिटवून समाधान करून देतो, म्हणत त्याने 50 हजार रुपये मागितले. महिलेने त्यास होकार दिला. त्यानंतर अल्ताफ हा या महिलेस मालेगाव येथून नेरी येथील आश्रमात घेऊन आला. तिथे त्याने आपणास संमोहित केले. दुसर्या दिवशी शुद्धीवर आल्यावर बाबाने आपणास अश्लील व्हिडीओ दाखवून धमकी देण्यास सुरुवात केली. तसेच धर्मांतर करुन लग्नही लावले आणि त्याने पहिली पत्नी व मुलगा असल्याचे लपविले. दुसरीकडे आपणास धमकी देत वेळोवेळी अंदाजे अडीच लाख रुपये उकळले. आपण त्याचे घर सोडून माहेरी निघून गेले. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यास जाणार त्याआधीच बाबाने आपल्या मुलाचे अपहरण केले. त्यानंतर सोहेल अन्सारी आणि एका महिलेने धमकी दिली. याबाबत जामनेर पोलिसात 6 ऑक्टोबर विविध कलमांन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक अंबादास पाथडकर, अरविंद मोरे, विनोद पाटील तपास करीत आहे.


