कोल्हाडीच्या अल्पवयीने मुलीचे अपहरण : दोघा आरोपींना अटक


जळगाव : बोदवड तालुक्यातील कोल्हाडी येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता अपहरण करुन तीला इंदूर (मध्यप्रदेश) येथे पळवून नेणार्‍या प्रकाश रतन बावस्कर (22) व गणेश सुनील राणे (19, दोघे रा.कोल्हाडी, ता.बोदवड) या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी 9.30 वाजता अटक केली.

एकाच दुचाकीवरुन पसार होतांना गावकर्‍यांनी पाहिले
कोल्हाडी येथील अल्पवयीन तरुणी, प्रकाश व गणेश हे एकमेकांना परीरचीत होते. 7 डिसेंबर रोजी सायंकाळी कोल्हाडी शिवारातील प्रमोद ढाके यांच्या शेतात प्रकाश व अल्पवयीन मुलीची भेट झाली. यानंतर काही वेळातच प्रकाशने स्वत:ची दुचाकी आणून याच दुचाकीवरुन त्याने मुलीला पळवुन नेले. यावेळी त्यांच्यासोबत गणेश देखील आला. गणेश याने बोदवड शहराच्या बाहेर एका पेट्रोल पंपवर दुचाकीत पेट्रोल भरले. यावेळी कोल्हाडी गावातील काही लोकांनी तिघांना पाहिले होते. यानंतर याच दुचाकीने ते रात्रभरातून थेट इंदूर (मध्यप्रदेश) येथे निघुन गेले.


बोदवड पोलिसात दाखल होता गुन्हा
प्रकाशचे नातेवाईक सुशीला नारायण भुसारे यांच्या घरी तीघे थांबले होते. तर इकडे कोल्हाडी गावात तरुणीच्या कुटुंबीयांनी तीचा शोध सुरू केला. ती मिळुन न आल्यामुळे बोदवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास सोपवला. दोन पथके तयार केली. एक पथक प्रकाशचा एक मित्र दौंड (ता. अहमदनगर) येथे असल्याने तो तिकडे पळुन जाण्याची शक्यता होती. त्यानुसार एक पथक दौंडला रवाना झाले. तर पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, उपनिरीक्षक रवींद्र गीरासे, राजेंद्र पाटील, कमलाकर बागुल, दीपक पाटील, विजय पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, अनिल देशमुख यांच्या पथकाने गणेश राणे याचे लोकेशन ट्रेस केले. त्यानुसार या पथकाने थेट इंदूर गाठुन प्रकाशसह तीघांना ताब्यात घेेतले. पुढील तपासासाठी प्रकाश व गणेश यांना बोदवड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !