हजेरी पटावर खाडाखाड करीत स्वाक्षर्या : यावल न्यायालयाच्या लिपिकाविरुद्ध गुन्हा
यावल : न्यायालयीन कर्मचार्याची गैरहजेरी लावल्यानंतर त्याने हजेरी पटावर खाडाखोड करीत स्वाक्षर्या केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर संबंधित क्लार्कविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल दिवाणी न्यायालयातील आरोपी विजय पंढरीनाथ सूर्यवंशी लिपिक हे 19 ऑक्टोबर 2020 ते 7 नोव्हेंबर 2020 या कालावधीत न्यायालयात गैरहजर राहिल्याने त्यांची गैरहजेरी नोंदवण्यात आली होती मात्र सूर्यवंशी यांनी कार्यालयातील हजेरीपटावर खाडाखोड करीत स्वाक्षर्या केल्या व ही बाब उघडकीस आल्यानंतर यावल न्यायालयाचे न्या.जगताप यांनी यावल पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावल पोलिस निरीक्षक एस.बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजमल पठाण हे करीत आहेत.

