आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विकासकामांचे भूमिपूजन
सायंकाळी जामनेर रोडवरील संपर्क कार्यालयात चाहत्यांसह कार्यकर्त्यांकडून करणार शुभेच्छांचा स्वीकार
भुसावळ : भुसावळचे लाडके आमदार संजय सावकारे यांचा शुक्रवार, 11 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने भुसावळ ग्रामीणमध्ये शुक्रवारी दिवसभर विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण होणार आहे. दरम्यान, सायंकाळी पाच ते आठ दरम्यान आमदार सावकारे हे चाहत्यांसह कार्यकर्त्यांकडून जामनेर रोडवरील संपर्क कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
भुसावळ ग्रामीणमध्ये आज विकासकामांचे भूमिपूजन
आमदार सावकारे यांच्याहस्ते गुरुवारी सकाळी 10 वाजता तळवेल-पिंपळगाव रस्त्याचे भूमिपूजन, सकाळी 10.30 तळवेल-ओझरखेडा रस्त्याचे भूमिपूजन, काहुरखेडा येथे सकाळी 11 वाजता सभागृहाचे भूमिपूजन, हतनूर येथे सकाळी 11.30 सभागृहाचे भूमिपूजन, मौजे कठोरा येथे 12 वाजता आर.ओ.प्लाँट व रुग्णवाहिकेचे लोकार्पण, 12.30 वाजता साकरी-जाडगाव रस्त्याचे भूमिपूजन, दुपारी एक वाजता साकरी येथे सभागृहाचे भूमिपूजन, दुपारी दिड वाजता खडका-किन्ही-खंडाळा रस्त्याचे भूमिपूजन, दुपारी दोन वाजता मोंढाळा येथे सभागृहाचे लोकार्पण, दुपारी अडीच वाजता साकेगाव येथे सभागृहाचे लोकार्पण, दुपारी तीन वाजता गोंभी-सुनसगाव रस्त्याचे भूमिपूजन, दुपारी साडेतीन वाजता बेलव्हाळ येथे शिधापत्रिकांचे वाटप, दुपारी चार वाजता हतनूर व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

सायंकाळी करणार शुभेच्छांचा स्वीकार
आमदार संजय सावकारे हे शुक्रवारी सायंकाळी पाच ते आठ दरम्यान जामनेर रोडवरील संपर्क कार्यालयात चाहत्यांसह कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. कार्यकर्त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असेही आवाहन आमदार यांनी केले आहे.

