चेन्नई-एग्मोर-जोधपूर दरम्यान विशेष उत्सव गाडी धावणार
भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे चेन्नई-एग्मोर-जोधपूरदरम्यान विशेष उत्सव गाडी चालवण्यात येणार आहे. ही गाडी संपूर्णतः आरक्षित असून केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या रेल्वे प्रवाशांना गाडीत प्रवेश दिला जाणार असून रेल्वे प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.
12 डिसेंबरपासून धावणार गाडी
अप 06067 चेन्नई-एग्मोर-जोधपूर विशेष उत्सव गाडी 12 ते 26 डिसेंबरदरम्यान दर शनिवारी प्रस्थान स्टेशनहुन 3.30 वाजता सुटल्यानंतर तिसर्या दिवशी जोधपूर स्टेशनवर आठ वाजता पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, मैसाना, पालनपूर, आबु रोड, पिंडवारा, फालना, मारवार, पाली मारवाड येथे थांबा देण्यात आला आहे. डाऊन 06068 जोधपूर-चेन्नई-एग्मोर विशेष उत्सव गाडी 14 ते 28 डिसेंबरदरम्यान दर सोमवारी प्रस्थान स्टेशनहुन 11.55 वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्या दिवशी चेन्नई-एग्मोर स्टेशनवर 4.10 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा, चंद्रपूर, बल्लारशाह, वारंगल, खम्मम, विजयवाडा, ओगोल, नेल्लोर, गुडूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.


