जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 56 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 55 हजार 07 वर : एकाच दिवसात 51 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात तिघा रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे 56 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1312 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून गेल्या 24 तासात तब्बल तीन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 55 हजार 07 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 53 हजार 288 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर शुक्रवारी एकाच दिवसात 51 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

शुक्रवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 15
जळगाव ग्रामीण 01
भुसावळ 02
अमळनेर 00
चोपडा 04
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 15
एरंडोल 00
जामनेर 01
रावेर 00
पारोळा 03
चाळीसगाव 00
मुक्ताईनगर 14
बोदवड 00
अन्य जिल्हा 01


एकाच दिवसात तीन रुग्णांचा मृत्यू
एकीकडे कोरोना रुग्ण संख्येचा आलेख कमी होत असताना जिल्हावासीयांना दिलासा मिळत असताना दुसरीकडे गेल्या 24 तासात तब्बल तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गजळगाव शहरातील 62 वर्षीय पुरूषासह भुसावळ तालुक्यातील 66 वर्षीय पुरूष व यावल तालुक्यातील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !