आमदार संजय सावकारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
भुसावळ ग्रामीणमध्ये विकासकामांचे उद्घाटन ः जामनेर रोडवरील संपर्क कार्यालयात चाहत्यांसह समर्थकांची गर्दी
भुसावळ : भुसावळचे लाडके आमदार संजय सावकारे यांचा शुक्रवार, 11 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हितचिंतक व कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवरून व सोशल मिडीयावरून शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान, भुसावळ ग्रामीणमध्ये वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.
भुसावळ ग्रामीणमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
आमदार सावकारे यांच्याहस्ते गुरुवारी सकाळी 10 वाजता तळवेल-पिंपळगाव रस्त्याचे भूमिपूजन, सकाळी 10.30 तळवेल-ओझरखेडा रस्त्याचे भूमिपूजन, काहुरखेडा येथे सकाळी 11 वाजता सभागृहाचे भूमिपूजन, हतनूर येथे सकाळी 11.30 सभागृहाचे भूमिपूजन, मौजे कठोरा येथे 12 वाजता आर.ओ.प्लाँट व रुग्णवाहिकेचे लोकार्पण, 12.30 वाजता साकरी-जाडगाव रस्त्याचे भूमिपूजन, दुपारी एक वाजता साकरी येथे सभागृहाचे भूमिपूजन, दुपारी दिड वाजता खडका-किन्ही-खंडाळा रस्त्याचे भूमिपूजन, दुपारी दोन वाजता मोंढाळा येथे सभागृहाचे लोकार्पण, दुपारी अडीच वाजता साकेगाव येथे सभागृहाचे लोकार्पण, दुपारी तीन वाजता गोंभी-सुनसगाव रस्त्याचे भूमिपूजन, दुपारी साडेतीन वाजता बेलव्हाळ येथे शिधापत्रिकांचे वाटप, दुपारी चार वाजता हतनूर व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. सर्व कार्यक्रमात सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले तसेच प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
जामनेर रोडवरील आमदारांच्या संपर्क कार्यालयात पारोळा नगराध्यक्ष करण पवार, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, गटनेता मुन्ना तेली, नगरसेवक प्रमोद नेमाडे, अॅड.बोधराज चौधरी, रवी सपकाळे, युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, पिंटू कोठारी, अजय नागराणी, किरण कोलते, निकी बत्रा, परीक्षीत बर्हाटे, गिरीश महाजन, वसंत पाटील, सतीश सपकाळे, शफी पहेलवान, राजकुमार खरात, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, मनोज बियाणी, संतोष बारसे, अमोल इंगळे, किशोर पाटील, वरणगावचे गणेश धनगर, बबलू माळी यांच्यासह स्थानिक व जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक व समर्थकांनी आमदारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रसंगी केकही कापण्यात आला.


