भुसावळात आरटीपीसीआर तपासणी शिबिराचा शुभारंभ
भुसावळ : ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटरद्वारे शहरात आरटीपीसीआर तपासणी मोहिमेला प्रारंभ करण्यात आला असून शनिवारी भुसावळ शहर पोलिस स्टेशनपासून त्याचा शुभारंभ करण्यात आला. शहर पोलिस ठाण्यातील सर्व होमगार्ड, कर्मचार्यांची आणि अधिकारी वर्गाची तपासणी करण्यात आली तसेच यावेळी कोरोनाबद्दल जनजागृतीदेखील करण्यात आली. या सर्वांचे तपासणी अहवाल सोमवारी येणार आहेत, त्यानुसार पुढील उपचाराची अथवा विलगीकरण्याची कारवाई सुरू होणार आहे. दरम्यान, सोमवारी बाजार पोलिस स्टेशनमधील पोलिस बांधवांची तपासणी होणार आहे.
पोलिस बांधवांपासून तपासणीला सुरूवात
कोरोनाच्या दुसर्या लाटेची शक्यता पाहता जळगाव जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार भुसावळ शहरात ज्यांचा जास्तीत-जास्त जास्त लोकांशी संपर्क येतो अशांच्या तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले. पोलिस कर्मचार्यांपासून तपासणीला सुरुवात झाल्यामुळे पुढील तपासणी शिबिरात जास्तीत-जास्त प्रतिसाद मिळेल असा आशावाद शहर पोलिस स्टेशनचे प्रमुख पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
तपासणीप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ.नितु पाटील, ग्रामीण रुग्णालय भुसावळ व ट्रॉमा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयुर नितीन चौधरी, डॉ.विक्रांत सोनार, शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, संजय पाटील, सैय्यद इकबाल, संजय टाकणे, विजय पाटील, मोहन पाटील, सचिन चौधरी, अनिल चौधरी, मोहम्मद अली, विनोद गोसावी, आशा तडवी, विनोद तडवी, समाधान पाटील आदी उपस्थित होते. सागर सोनवणे, विद्या तायडे, एलियास शेख, निरंजना साळवे या कर्मचारी वर्गाने परीश्रम घेतले.
भुसावळ पॅटर्न जळगाव जिल्ह्यात गाजणार
डॉक्टर मयूर नितीन चौधरी आणि त्यांच्या सहकार्यांनी सुरू केलेले हे हे व्यापक कोरोना तपासणी शिबिर नक्कीच कोरोना संक्रमणाचा दर कमी करण्यासाठी मदत करेल आणि हा भुसावळ पॅटर्न जळगाव जिल्ह्यात गाजणार यात शंका नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ.नि.तु.पाटील यांनी दिली.

