भुसावळात स्व.गोपीनाथजी मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
भुसावळ : संघर्षयात्री, कुशल संघटक, राजकीय क्षेत्रात संघटन, विकास, वक्तृत्व, नेतृत्व आणि सर्वांचे प्रेरणास्थान असलेले लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी आमदार संजय सावकारे यांच्या जामनेर रोडवरील संपर्क कार्यालयात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार संजय सावकारे, भुसावळ शहर सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, नगरसेवक युवराज लोणारी, मनोज बियाणी, राजेंद्र नाटकर, शेखर इंगळे, अजय नागराणी, बिसन गोहर, विशाल जंगले, निखील वायकोळे, राम माहुरकर, शिशिर जावळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1


