मुंबई ते नागपूर दरम्यान विशेष उत्सव ट्रेन धावणार
भुसावळ : मध्य रेल्वेला प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई ते नागपूर दरम्यान उत्सवासाठी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्यापासून धावणार विशेष ट्रेन
अप 02048 सुपरफास्ट विशेष उत्सव ट्रेन 13 रोजी नागपूर येथून सहा वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 7.45 वाजता पोहोचणार आहे. डाऊन 02047 सुपरफास्ट विशेष उत्सव ट्रेन 15 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रात्री 11.30 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी 1.15 वाजता नागपूर येथे पोहोचणार आहे.

या स्थानकावर गाडीला थांबे
या गाडीला वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण आणि दादर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक प्रथम वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, सात शयनयान आणि चार द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना या गाडीत प्रवासाची परवानगी मिळणार असून प्रवाशांना कोविड नियमांचे पालन करावे लागणार आहे.

