मुंबईसह हावडा व रांची दरम्यान विशेष गाड्या धावणार
भुसावळ : रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळण्यासाठी मुंबई व हावडा तसेच रांची दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई-हावडा विशेष एक्स्प्रेस
अप 02260 हावडा-मुंबई विशेष गाडी 14 डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दररोज प्रस्थान स्टेशनहुन दोन वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी मुंबई स्टेशनवर 9.20 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नाशिक रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 02259 मुंबई-हावडा विशेष गाडी 16 डिसेंबरपासून दररोज प्रस्थान स्थानकापासून सहा वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्या दिवशी हावडा स्टेशनवर 12.30 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, नागपूर वर्धा, नागपूर, भंडारारोड, गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडकपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन द्वितीय वातानुकूलित तसेच 13 शयनयान, दोन द्वितीय आसन श्रेणी आणि एक पेंट्री कार असणार आहे.

मुंबई-रांची विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस
डाऊन 08610 विशेष गाडी 18 डिसेंबरपासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शुक्रवारी 4.40 वाजता सुटल्यानंतर तिसर्या दिवशी रांची येथे 06.25 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 08609 रांची-एटीटी एक्स्प्रेस 16 डिसेंबरपासून रांची येथून दर बुधवारी 9.05 वाजता सुटल्यानंतर तिसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 07.25 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इटारसी, पिपरीया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज जंक्शन, वाराणसी, पं.दीनदयाल उपाध्याय जंक्शन, भभुआ रोड, सासाराम, डेहरी ऑनसोन, अनुग्रह नयन रोड, गया, कोडरमा, हजारीबाग रोड, एनएससी बोस जंक्शन गोमोह, चंद्रपुरा जंक्शन, राजाबेरा, बोकारो स्टील सिटी आणि मुर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, 13 शयनयान, तीन द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 02259 व 08610 चे विशेष शुल्कासह बुकींग 12 डिसेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणिुु रेल्वे संकेतस्थळावर सुरू झाले आहे.
केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान कोविड 19 नियमांचे पालन करावे लागणार आहे.

