पाच रेल्वे गाड्यांचे बुकींग 9 व 11 एप्रिलपासून थांबवले
ट्रेनचे क्रमांक बदलणार असल्याने रेल्वे प्रशासनाचा निर्णय
भुसावळ : ईशान्य रेल्वेतर्फे धावणार्या पाच गाड्यांच्या क्रमांकात बदल करण्यात येणार असल्याने 9 व 11 एप्रिलपासून आगामी काही दिवसांसाठी गाड्यांचे बुकींग रद्द करण्यात आले आहे.
या गाड्यांचे थांबवले बुकींग
डाऊन 01015 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडी 9 एप्रिलपासून तसेच डाऊन 02167 लोकमान्य टिळक टर्मिनस-मांडुआडीह विशेष गाडीचे 9 एप्रिलपासून बुकींग थांबवण्यात आले आहे. डाऊन 05017 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडीचे तसेच डाऊन 02542 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडीसह डाऊन 05064 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडीचे 11 एप्रिलपासून थांबवण्यात आले आहे. वरील गाड्यांचे बुकींग पुन्हा सुरू करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनातर्फे कळवण्यात येणार आहे.


